mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Branch manager of Buldhana District Central Cooperative Bank branch Udaynagar killed, one injured in collision with unknown vehicle : अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा उदयनगरचे शाखाधिकारी ठार

बुलढाणा /प्रतिनिधी 

उदयनगर – येथून जवळच असलेल्या डासाळा गावच्या  नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार  ठार झाल्याची घटना 31 जानेवारीच्या सायंकाळी ६.४० वा.च्या सुमारास घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेले इसम विजय माधव आराख  वय ५७ वर्ष  रा. सरकारी दवाखान्याजवळ मिलिंद नगर बुलढाणा  येथे ते राहत होते.ते उदयनगर येथील बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.

 शासन स्तरावरून थकीत कर्जदार व चालू कर्जदार यांच्या याद्या बँकेकडून मागविण्यात येत असल्याने सदर शेतकऱ्यांच्या याद्या करणे चालू  होते ३१ जानेवारी रोजी शाखेचे दैनंदिन कामकाज उरकून याद्याचे काम करीत शाखा बंद केल्यानंतर सायंकाळी जवळपास ६:१५ वाजेच्या आसपास विजय आराख हे त्यांच्या  ताब्यातील दुचाकी क्रमांक MH 28 AW  6305 ने घराकडे बुलढाणा येथे जात असतांना डासाळा नजीक  एका अज्ञात वाहनाने आराख यांच्या दुचाकीला  जोरदार धडक दिली 

ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे बुलढाणा येथे उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचेवर शोकाकुल वातावरणात १ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे 

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top