mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A grand free health camp was organized by the Public Shiv Jayanti Festival Committee, Godri: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गोदरी याच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिर सपन्न 

गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

चिखली(प्रतिनिधी)  दि.19 : तालुक्यातील गोदरी येथे  छत्रपती शिवजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गोदरी यांची तर्फे मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ,या शिबिरात विविध तपासण्या करण्यात आल्या ,बीपी शुगर, हृदयरोग, गुडघेदुखी ,कंबरदुखी ,छातीत दुखणे, दमा, सतत खोकला , श्वसनाचे विकार, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध  थायरॉईड,गाठ मानेचे आजार व चेहऱ्याच्या च्या समस्या गर्भधारणा तपासणी, सामान्य आजार, दीर्घकालीन आजार, शरीरातील सर्व आजारांचे निदान  व मार्गदर्शन करण्यात आले . सौ. डॉ. अंकिता उमेश सावजी,डॉ.उमेश सावजी,डॉ. प्रशांत चिंचोले डॉ. कैलास मेरत (पाटील)  या नामांकित डॉक्टरांनी उपचार तथा तपासणी केली . या शिबिराला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गोद्री येथिल आरोग्यसेवक प्रा.दिपक भीसे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली महाजन, संगीता अंभोरे (ANM), जया मघाडे (anm) व आशा सेविका  डॉ.किशोर गवई, डॉ.रश्मी पाटील,(मेडिकल ऑफिसर) विजय डुकरे,माया बडगे,सर्व ग्रामीण रुग्णालय चिखली यांनी विशेष योगदान दिले.गावकऱ्यांचा उस्फुर्त सहभाग मिळाला.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top