mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A helping hand! Bhim Army activists rushed to help एक हात मदतीचा! भीम आर्मीचे कार्यकर्ते धावले मदतीला

बुलडाणा/ प्रतिनिधी
मूकनायक फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या संकल्पनेतून रूग्णवाहिका नागरिकांसाठी कार्यरत झाली आहे. आज रोजी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना मदत करण्यात आली असून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. याबाबत सविस्तर असे की, जाफराबाद येथील अनिता दांडगे या आजीबाई बुलडाणा रूग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या पतींना संचेती हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जात होत्या. दरम्यान अचानक एका दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. घटनेची माहिती भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांना कळताच  त्यांनी तत्काळ मूकनायक फाउंडेशन ची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आणि क्षणाचाही विलंब न करता सदर आजींना भवटे हॉस्पिटल बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर घटना गोडे साहेब यांच्या घराजवळ घडली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top