अध्यक्ष सुनिल शिंदे तर उपाध्यक्ष पदी अश्विनी आदबाने यांची निवड
आमदार श्वेताताई महाले यांनी जिल्हा परिषद शाळा शिक्षणाकडे लक्ष द्यावे पालकांची मागणी


अमडापूर – (प्रतिनिधी) येथील जि. प. मराठी प्रा.कन्या शाळेची पालक सभा नुकतीच पार पडली आहे. या पालक सभेमध्ये नविन शाळा व्यवस्था पण समिती गठित करण्यात आली आहे. या सभेमध्ये सुनिल शिंदे यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी अश्वीनी आदबाने यांची निवड करण्यात आली. सदस्य पदी समाधान सुरेश देडे, केशव भगवान हस्काळ,नितीन सुदाम जाधव, रामेश्वर श्रीराम जाधव,गजानन पांडुरंग पवणारकर,विजय पुंडलीक नेमाडे,सौ.राधा रामेश्वर वानखेडे,सदस्या निता संदीप ढंगे,सरला शंतनू ईश्वरे” पुष्पा डिगांबर सोनुने,ग्रा.पं. सदस्या राजनंदीनी शिवाजी गायकवाड, संजिवनी मधुकर शितोळे सचिव श्री. विश्वनाथ काशीनाथ जाधव यांची – निवड करण्यात आली. शितोळे मॅडम व विश्वनाथ जाधव या पती ‘ पत्नी दांपत्यांनी या शाळेचा चेहरा मोहरा बदलुन टाकला असून हि शाळा त्यांनी डीजीटल बनवली आहे. मराठी शाळेचा परिसरात नाव लौकीक वाढला असल्याने प्रत्येक पालक या शाळेकडे आकर्षित होत आहे असून याच शाळेत शिकवण्यासाठी आग्रह करत आहे. शितोळे व जाधव दांपत्यांने सारखेच शिक्षकांची नियुक्ती केल्यास ह्या शाळेत सुद्धा सुधारणा होऊ शकते व दर्जा सुधारू शकतो असे काही सेवा निवृत शिक्षकांचे मत आहे. या बाबी कडे आमदार श्वेता ताई महाले व जि.प. शिक्षण विभागाने लक्ष घालावे अशी मागणी अमडापूर येथील पालक वर्गाच्या वतीने होत आहे.


