mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Bear seen in Amdapur Shri Ballal Devi Temple area, leopard seen in farm field; Fear among farmers : अमडापूर श्री बल्लाळ देवी मंदिर परिसरात  अस्वलाचा वावर तर शेतशिवारात  बिबट्याचे  दर्शन; शेतकऱ्यामधे  भीतीचे वातावरण

अमडापूर /प्रतिनीधी

अमडापूर व मेडसिंगा परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या व अस्वलाचे दर्शन झाल्याच्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अमडापूर–मेडसिंगा मार्गावर २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जयस्वाल यांच्या शेताजवळ भर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. अचानक रस्त्यावर बिबट्या दिसल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही काळ मोहदरी व मेडसिंगा दिशेने जाणारी वाहतूकही संथ झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगली.दरम्यान, यापूर्वी २५ जानेवारी रोजी उदयनगर शिवारात भिमराव अंभोरे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढले होते. या घटनेनंतर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.  याच दिवशी दुसऱ्या घटनेत अमडापूर येथील बल्लाळ देवी मंदिर परिसरात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका अस्वलाने बल्लाळ देवी मंदिर परिसरात प्रवेश केल्याची घटना घडली. या अस्वलाने या अस्वलाने परिसरातील गणपती मंदिरात प्रवेश करत गणपतीचा सिंदूर चाटला  तसेच तेथे तेवत असलेल्या दिव्यातील  तेल पिल्याचे आढळून आले. फिरण्यासाठी गेलेले नितीन जाधव, सुनील शिंदे, नितीन देढे व गजानन देशमुख सर यांच्या ही घटना निदर्शनास आली. अस्वल काही वेळ मंदिर परिसरात वावरत राहिल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने अमडापूर व मेडसिंगा  परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लहान मुले, शेतकरी तसेच रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वन विभागाने या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदारमागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top