महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तांजली अर्पणआज. दि.06 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव ग्रुप बुलढाणा यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे सुमित गायकवाड यांच्या नेतृत्वात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बुलढाणा – आज. दि.06 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव ग्रुप बुलढाणा यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे सुमित गायकवाड यांच्या नेतृत्वात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील युवकांनी मोठ्या संख्येने या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन महारक्तदान शिबीर प्रचंड ताकतीने यशस्वी केले. स्वतःच्या शरीरातील रक्त दान करून खऱ्या अर्थाने महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तांजली अर्पण केली.महामानवाला कोटी कोटी विनम्र अभिवादन


