mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Citizens’ outcry against Savana Gram Panchayat’s neglect of the backward class population: सवणा ग्रामपंचायतचे मागासवर्गीय वस्थीवर दुर्लक्ष सवणा ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांचा आक्रोश

चिखली(प्रतिनिधी):तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेले नावाजलेले गाव सवणा येथील वर्ड क्र. ५ मध्ये साचलेल्या गटारमुळे मागासवर्गीय वस्तीतील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून, वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही याचबरोबर बौद्ध स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे कामही प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२९ सप्टेंबर तसेच २६ डिसेंबर २०२५ वे स्मरणपत्र तसेच मंगळवार ६ जानेवारी २०२६ चे निवेदन देऊनही सवणा ग्रामपंचायतीने वार्ड क्र. ५ मधील साचलेल्या गटाराच्या समस्येवर कोणतीही उपाययोजना केलेली नाही, असा आरोप नागरिकानी केला आहे या गटारामुळे सपूर्ण दलित वस्तीचे आरोग्य धोक्यात आले असून जवळपास प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती आजारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

विशेष म्हणजे नागरिकानी ५० टक्के वसुली भरुनही गटाराची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. तसेच बौद्ध समाजासाठी अत्यत महत्त्वाच्या असलेल्या बौद्ध स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे कामही अद्याप सुरू न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या संदर्भात दिपक परशराम कस्तुरे। संचालक,ग्रामसेवा सहकारी सोसायटी सवणा व मा. ग्रामपंचायत सदस्य) तसेच वार्ड क्र. ५ मधील नागरिकानी स्पष्ट इशारा दिला आहे की, लोकशाही मार्गाने जनआदोलन करून ग्रामपंचायतीला जागे करण्यासाठी भव्य-दिव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाची सपूर्ण जबाबदारी सवणा ग्रामपंचायतीची राहील, असेही त्यानी ठामपणे नमूद केले आहे जर शुक्रवार, २३ जानेवारीपर्यंत गटाराची समस्या सोडवली गेली नाही आणि बौद्धस्मशानभूमीचे

सुशोभीकरण करण्यात आले नाही, तर सवणा गावात तीव्र स्वरुपाचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नागरिकानी जाहीर केले आहेया निवेदनावर दिपक कस्तुरे, मेजर मदन शिरसाट, सविता कस्तुरे सम्राट शिरसाट, मधुकर साळवे, संतोष चांदोरे, नितीन कस्तुरे, जयश्री शिरसाट, कवित्ता शिरसाट, योगेश करवंदे, सतीश करवंदे, सत्यभामा सुरडकर, मंगेश साळवे, भारत कस्तुरे, सुरेखा कस्तुरे, संगीता शिरसाट, दुर्योधन कस्तुरे इत्यादीच्या सह्या आहेत.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top