
बुलढाणा(प्रतिनिधी).26जानेवारी
: केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम तसेच जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांच्या प्रसार-प्रसिद्धीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन लक्ष्मण राठोड यांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाच्या विविध उपक्रमांची प्रसार-प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आणि माध्यमांच्या समन्वयाने शासनाच्या धोरणांचा सकारात्मक संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


