बुलडाणा येथील म्हाडा कॉलनीमध्ये महापरिनिर्वाण दिन संपन्नविश्वरत्न बोधीसत्व , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधाराा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली होईल असे प्रतिपादन भीम आर्मी जिल्हाध्यक्ष तथा मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी केले.

बुलडाणा/ (प्रतिनिधी )विश्वरत्न बोधीसत्व , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधाराा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली होईल असे प्रतिपादन भीम आर्मी जिल्हाध्यक्ष तथा मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी केले. ६ डिसेंबर रोजी बुलडाणा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी तथागत भगवान गौतम बुध्दांचे विचार उपस्थितांना समजावून दिले. यावेळी आपले विचार मांडताना सतिश पवार म्हणाले की, आपली खरी वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन व्हायला हवी. मागे राहिलेल्या मदतीचा हात, सोबत असलेल्यांना साथ आणि वाटेला जाणार्याला लात द्यायला हवी असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समर्पक दाखले देऊन मांडले. यावेळी अॅड. अनुराधा जाधव यांनीही आपले विचार व्यक्त केले. अभिवादन सभेचे प्रास्ताविक दिपक इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सिध्दार्थ जाधव यांनी केले. कार्यक्रमाला म्हाडा कॉलनीतील माता-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


