mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Eng. Vijay More appointed as Republican Army Buldhana District President: इंजि. विजय मोरे  यांची रिपब्लिकन सेना बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती….

बुलढाणा/प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, धार्मिक चळवळीत विशेष सहयोग व योगदान देणारे, आंबेडकऱी वैचारिक चळवळीचा समृद्ध वारसा आयुष्यभर जपणारे  इंजि. विजय मोरे यांची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना च्या बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

मा. प्रफुल्ल शेंडे, रिपब्लिकन सेना विदर्भ अध्यक्ष यांनी मा. विजयजी मोरे(सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर) यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. मा. विजयजी मोरे यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक, आंबेडकरी चळवळीत केलेल्या निष्ठावान कार्याची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांनी हे नियुक्ती पत्र प्रदान केलं. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. डॉ. सुशील सूर्यवंशी, रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्र नेते मा. प्रा. सुनिल वाकेकर इत्यादी उपस्थिती होते.

विजयजी मोरे हे केवळ प्रशासकीय अनुभवाचे धनी नसून, त्यांनी सेवेच्या काळात आणि सेवानिवृत्तीनंतरही वंचित, शोषित, दलित व बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट नात्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

या नियुक्तीमुळे विदर्भात बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन सेनेचा बालेकिल्ला म्हणून उदयास येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची क्षमता आणि स्पष्ट वैचारिक भूमिका यामुळे रिपब्लिकन सेनेची पकड ग्रामीण व शहरी भागात अधिक मजबूत होईल.

त्याचबरोबर या घडामोडीचा थेट परिणाम जिल्ह्यातील रिपाई (आठवले गट) वर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विजयजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेला वाढते जनसमर्थन मिळाल्यास, वंचित बहुजन आघाडी, रिपाई आठवले गट यामध्ये राजकीय फूट आणि संघटनात्मक धक्का बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे स्पष्ट मत आहे.

एकूणच, ही नियुक्ती केवळ पदभाराची नसून, बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी राजकारणाला नवी दिशा देणारी, शक्तिसंतुलन बदलणारी आणि विदर्भातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.

या नियुक्ती बद्दल सम्यकक्रांती सोशल फोरम महाराष्ट्र राज्य. चे संस्थापक अध्यक्ष, लॉर्ड बुद्धा टीव्ही चे महाराष्ट्र ब्युरो चीफ प्रा. गजेंद्र गवई, तेजस्विनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, वडगाव माळी, समस्त उपासिका संघ यांचे वतीने विशेष अभिनंदन केले आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top