mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Excellent success of students of ZP Sakegaon School in the Central Sports Competition : जि. प. साकेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट यश 

चिखली (प्रतिनिधी)

सोमवार, दि.19 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या  केंद्रस्थरीय क्रीडा स्पर्धा श्री.शिवाजी हायस्कूल साकेगांव येथे जि. प. शाळेचे केंद्र सावरगाव  डुकरे शाळेच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत साकेगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळून विजय मिळवला. वर्ग 1ते 5 च्या मुली कबड्डी संघामध्ये  उत्कृष्ट   खेळून विजेता ठरल्या.तर वर्ग 1ते5 व 6ते 8 चे मुले कबड्डी संघामध्ये  उपविजेता ठरले. 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत  अनुष्का. वि. इंगळे प्रथम तर लूंबिनी आ. निकाळजे हिने द्वितीय  क्रमांक मिळविला.100 मिटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांमधून नावेद सईद खा प्रथम क्रमांकाने तर 200 मिटर धावण्याच्या शर्यतीमध्ये मध्ये रोशन सु. लोखण्डे याने द्वितीय क्रमांक मिळविला . मुलीमधून 200 मिटर धावण्याच्या स्पर्धेत  जोया आलम खा द्वितीय आली. या खेळात सहभागी झालेल्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे ट्रॉफी देऊन स्वागत  करण्यात आले

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top