mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Health Center Rambharose at Karwand ZP Chief Executive : करवंड येथील आरोग्य केंद्र रामभरोसे ? जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनभिज्ञ

बुलडाणा/ प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील करवंड येथील आरोग्य केंद्र रामभरोसे असल्याचे चित्र आज १४ जानेवारी रोजी दिसून आले. एकंदर प्रकार पाहता जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी हे सुध्दा या प्रकरणापासून अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यांतर्गत चिखली तालुक्यातील उदयनगर केंद्रांतर्गत येणार्‍या करवंड येथे आज १४ जानेवारी रोजी कुठलीही शासकिय सुटी नसताना केवळ डॉ. स्वप्नील हिवाळे हेच ड्युटी बजावताना दिसून आले. इतर तिघे कर्मचारी चक्क गायब असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हजेरी रजिस्टरमध्ये केवळ एकाच कर्मचार्‍यांची हजेरी दिसून येत आहे. त्यामुळे करवंड येथील आरोग्य केंद्र रामाभरोसे असल्याचे दिसून आले. आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र करवंड इथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी उपकेंद्र चालू असतांना आज १४ जानेवारी रोजी एकूण कर्मचार्‍यापैकी फक्त  डॉ. स्वप्नील हिवाळे म्हणून उपस्थित होते. बाकीचे कर्मचारी यांनी  वरिष्ठ अधिकाऱ्याकडे / डॉक्टरांकडे अर्ज न करता दांडी  मारली  आहे. वरिष्ठांना अर्ज न दाखल करता त्यांनी आज दांडी मारल्याचं प्रत्यक्ष ठिकाणी दिसून आले आहे. याबाबत करवंडचे डॉ. स्वप्नील हिवाळे यांनी गैरहजर कर्मचार्‍यांना विचारणा केली असता एकाने व्हिजीट करून येत असल्याची माहिती दिली. तर एका बहादराचा फोन बंद असल्याचे दिसून आले. तर एकाने उलट आज सुटी असल्याचे सांगितले अशी माहिती डॉ. स्वप्नील हिवाळे यांनी दिली. उदयनगर केंद्राचे डॉ.स्वप्नील खंडागळे हे  वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्या अख्त्यारीत करवंड उपकेंद्र आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती  नसल्याचे सांगितले हे विशेष!  त्यांनी सांगितले आहे. एकंदर प्रकारावरून करवंड येथील मनमानी कारभार दिसून येत आहे.

गावातील नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या बेरजबाबदार व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गावकरी करणार असल्याची माहिती मोक्यावर उपस्थित नागरिकांकडून मिळाली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top