mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Important news for teachersशिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संचमान्यता स्थगितीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. शिक्षक समायोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख सभा अशा संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

 

बुलढाणा – शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संचमान्यता स्थगितीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. शिक्षक समायोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख सभा अशा संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिका क्र. ५४५६/२०२५ मधील मा. न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दि. १५.०३.२०२५ अन्वये निर्गमित संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीचा अवलंब करुन समायोजना प्रक्रीया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग / विषय / अनुदानाचा/व्यवस्थापनाचा प्रकारासह) संचालनालयास, सादर करणेसाठी संचालनालयाचे पत्र दि. २०.११.२०२५ अन्वये क्षेत्रिय अधिका-यांस कळविण्यात आले होते.

तथापि, सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्यात असल्याने तसेच सन २०२४-२५ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त झाालेले शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रीया माहे. डिसेंबर, २०२५ मध्ये राबविणे व सन २०२५- २६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रीया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रीया राबविण्याऐवजी सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतरच समायोजन प्रक्रीया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांचे स्तरावरुन दि. २०.११.२०२५ च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे.

तसेच सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतर विहित कार्यपध्दतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजना करण्यात यावे. अशी माहिती सचिद्र प्रताप सिंग यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top