mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Inauguration of the annual sports competition प्राथमिक जैन विद्या मंदिर येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

प्राथमिक जैन विद्या मंदिर व आदर्श शिशुविहार चिंचवड स्टेशन येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री जयकुमारजी धोका , राष्ट्रीय खेळाडू विनिता कोळेकर व प्रगती मुडपे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विश्वनाथ मोडपे ,शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शिल्पा कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रजनीकांत शिरसाठ यावेळी उपस्थित होते.

 

 

पिंपरी :- प्राथमिक जैन विद्या मंदिर व आदर्श शिशुविहार चिंचवड स्टेशन येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री जयकुमारजी धोका , राष्ट्रीय खेळाडू विनिता कोळेकर व प्रगती मुडपे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विश्वनाथ मोडपे ,शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शिल्पा कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रजनीकांत शिरसाठ यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धामध्ये आकर्षक मनोरे सादर केले .तर विनिता कोळेकर ,प्रगती यांनी एरोबिक्स घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
डॉजबॉल, लंगडी, रस्सीखेच, कप बशी,अडथळा शर्यत, पोते उडी, अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मोबाईल मुक्त होऊन मैदानावर खेळण्यास आले पाहिजे.
संघभावना,खिलाडूवृत्ती,निर्णय क्षमता,शारीरिक व मानसिक विकास,राष्ट्रीय खेळाडू यातूनच तयार होतात,असे मनोगत पाहुण्यांनी व्यक्त केले.
मानद सचिव श्री. राजेंद्रकुमारजी शंकर लालजी मुथा, सहाय्यक सचिव श्री .अनिल कुमार जी मोतीलालजी कांकरिया यांचे मार्गदर्शन लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा शेवकरी ,प्रास्ताविक मुख्याध्यापिका वर्षा काटकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री गारगोटे रवींद्र यांनी केले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top