mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Injustice on the Social Justice Department itself! Rs 394 crores of Scheduled Caste rights looted 

Unforgivable negligence of Social Justice Minister: सामाजिक न्याय विभागावरच अन्याय  ! अनुसूचित जातीच्या हक्काचे 394 कोटी रुपये पळविले

  सामाजिक न्यायमंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष ! व्यापक जनआंदोलन उभारणार – भीम आर्मी

बुलढाणा, 24 जानेवारी (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाद्वारे 394 कोटी रुपये पळविले गेल्याचे सांगितले जात आहे. यंत्रणा मात्र कमिशन आणि हुजरेगिरी मध्ये व्यस्त असल्याचे आरोप देखील होत आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचे या विभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसत आहे .

भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर निषेध व्यक्त केला आहे. हा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्याकडे वळविला असल्याचे सांगितले जात आहे. पवार यांनी मागणी केली आहे की, लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे असल्यास भाऊजी च्या दारूच्या किमती दुप्पट चौपट कराव्यात व राज्य उत्पादन शुल्कातून तो पैसा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळविण्यात यावा.

सामाजिक न्याय विभाग हा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समूहाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे काम करतो. असे असताना अनुसूचित जातीच्या हक्काचा निधी इतरत्र वळविणे हा निर्णय निषेधार्थ आहे. या निर्णया विरोधात लवकरच रस्त्यावर येऊन व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top