mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Is the Waghapur Antri Group Gram Panchayat administration neglecting the Dalit settlement? Turning a blind eye!:वाघापूर अंत्री  गट ग्रामपंचायत प्रशासनाचे दलित वस्तीवर दुर्लक्ष ? डोळेझाक !

चिखली (प्रतिनिधी ) तालुक्यातील  वाघापूर व अंत्री  गट ग्रामपंचायत मागील गेल्या तीन वर्षांपासून ग्राम वाघापूर येथील नागरिक घाणीच्या सांड पाण्यामुळे अती त्रस्त आहेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नालीतील घाण सांडपाणी संपूर्ण गावातून खुल्या  नालीने वाहत येऊन बुद्ध विहार परिसरात व गावातील मुख्य रस्त्यावर जेथे  लोकांचे नेहमी  उठणे बसने , रस्त्याने येणे जाणे जास्त प्रमाणात असते . त्याच मुख्य चौकाच्या  ठिकाणी गावात येणाऱ्या पाहुण्यांचे सांडपाण्याने स्वागत होत असल्याची गावातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

या घाण सांडपाण्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे. लहान मुले ,वृद्ध नागरिकांना रस्त्यावर येणारे जाणार्या नागरिकांना   घाणीच्या वासाने, मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे,  रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विहार परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्याल गट विकास अधिकारी यांना गेल्या तीन वर्षांपासून वारंवार लेखी स्वरूपात कळविले आहे.अद्याप  ग्रामपंचायत प्रशासन, गटविकास अधिकारी यांनी कोणतेही कार्यवाही केलेली नाही.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे चिखली पं. स. चे गट विकास अधिकारी हे वाघापूर  अंत्रि गावाचे असल्याचे कळते. एका अधिकाऱ्याच्याच गावात  दलित वस्तीवर प्रशासनाचा काना डोळा का,डोळेझाक अशी चर्चा  आता सुरू आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top