mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Landless farmers protest march hits SDO office. Warns of self-immolation protest at Nagpur Vidhan Bhavan if Chief Minister does not take action: Bhai Pradeep Ambhore:भूमिहीन शेतकरी आक्रोश मोर्चा  SDO कार्यालयावर  

धडकला. मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्यास  नागपूर विधानभवनावर आत्मदहन आंदोलनाचा इशारा :भाई प्रदीप अंभोरे 

बुलडाणा जिल्हा व संभाव्य खामगांव जिल्ह्यातील शेतकरी, कामगार,भूमिहीन अतिक्रमण धारक कष्टकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१२.१२.२०२५ ला प्रचंड ‘”भूमिहीन शेतकरी आक्रोश” मोर्चा’ काढण्यात आला होता.या मोर्चात  मोठ्या संख्येने शेतकरी, कष्टकरी, बेघर नागरिक व अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.

खामगाव,(प्रतिनिधी ) बुलडाणा जिल्हा व संभाव्य खामगांव जिल्ह्यातील शेतकरी, कामगार,भूमिहीन अतिक्रमण धारक कष्टकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१२.१२.२०२५ ला प्रचंड ‘”भूमिहीन शेतकरी आक्रोश” मोर्चा’ काढण्यात आला होता.या मोर्चात  मोठ्या संख्येने शेतकरी, कष्टकरी, बेघर नागरिक व अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.

भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा बुलडाणा यांच्या वतीने भाई प्रदीप अंभोरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले .डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून  मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख  मार्गाने हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी कार्यालयाच्या प्रवेशव्दारा समोर ठिय्या देत मुख्यमंत्री होश मे आओ जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है अशा जोरदार घोषणांनी शासनाचे लक्ष वेधले. 

मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने विजय पाटील शहर पो स्टे ठाणेदार पवार यांचे मार्फत संघटना नेते भाई बाबुराव सरदार, भीमराव खरात, प्रभाकर वाकोडे, भगवान गवई, सारंगधार वाकोडे, श्रीकृष्ण मोरे ,रमेश गाडेकर ,दिपा पवार भरत मुंडे, या शिष्टमंडळा द्वारे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री मा.महसूल मंत्री, मा.वनमंत्री  यांना पाठविण्यात आले. 

शेतकरी व भूमिहीनांची १०० टक्के कर्जमुक्ती करावी, 1990 पूर्वी चे महसूल व गायरान व 13 डिसें. 2005 पूर्वीचे वन जमीन धारकांना पट्टे  मा. सर्वोच्च व मा.उच्च न्यायालयीन आदेशानुसार अडचणीवर उपाययोजना करा, ग्रामीण भागातील रमाई घरकुल योजनेसह सर्व घरकुल अनुदान वाढवून २.५ लाख रुपये करावे, ग्रामीण व शहरी भागातील  रमाई सह इतर ओबीसी आदिवासी घरकुल योजना निवासी अतिक्रमणां चे सर्वेक्षण, कालबद्ध कार्यक्रम राबवून पट्टे व घरकुल लाभ तात्काळ द्या, टाकारखेड हे.धोडप,डासाला, व अन्य ठिकाणी संभाव्य सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १९१ प्रकल्पांना स्थगिती द्यावी, खामगाव स्वतंत्र जिल्हा, तसेच लाखनवाडा व उदयनगर स्वतंत्र तालुका निर्मिती करावी , भूमिहीन कामगारांच्या अपघाती मृत्यूस दोन लाख विमा द्यावा, जिगांव व वैनगंगा पैनगंगा पेंनटकळी प्रकल्प बाधितांना प्रति कुटुंब २० लाखांचे सानुग्रह अनुदान द्यावे, जिल्ह्यातील मागासवर्गीय सरपंचांच्या 2वर्षांपासून अखर्चित १५ व्या वित्त आयोग निधी ग्रामसभा मंजुरात घेऊन वरील अडथळे दूर करून विकासकामे तातडीने सुरू करावीत. या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

 मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागपूर विधानभवना समोर दि.१४ डिसेंबर२०२५  रोजी आत्मदहन करण्याचा इशारा  प्रदीप अंभोरे यांनी दिला आहे. 

यावेळी भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा जिल्हा व तालूका नेते गजानन जाधव, ज्ञानदेव मिसाळ, अनिसखान पठाण ,हर्षवर्धन तायडे, अशोक इंगळे ,महेंद्र खंडारे,  शक्ती जाधव ,सुनील दांडगे, विलास पहूरकर,शिवदास तायडे, अविनाश वानखडे ,कदीर भाई, निसारभाई ,गौतम जाधव, कैलास ससाने, हुसेन सुरत्ने रामकृष्ण पाटील शेख लुकमान भाई सलीमभाई, रामेश्वर चव्हाण, डॉ ब्रिजलाल चव्हाण पुंजाजी सावंत, उत्तम जाधव, शेषराव चव्हाण, इलीयस पठाण, शाहीर सदानंद मोरे ,शाहीर वाकोडे, शाहीर भिवाजी धुरंधर, शांताराम सोनोने ,प्रकाश सोनोने ,नाना तायडे, देविदास साळवे, अनिल भारंबे पाटील , प्रमोद इंगळे, विष्णू राठोड, लाला सपकाळ, अमोल साबळे, बाळू गुढेकर, जगन्नाथ धर्माळी, रामेश्वर कोल्हे ,मारोती आंबीलकर, तेजराव वानखडे, दिगंबर वाकोडे ,शोभाताई वानखडे, कमलबाई वानखडे, सुरेखा वानखडे ,प्रल्हाद घोती बाबुराव मंजा, ललिता सरदार ,निर्मला शिंदे ,शांताबाई चव्हाण, चंदाबाई पवार, सिकरीट शिंदे ,सदाशिव पवार इत्यादी  पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकरी, कष्टकरी, बेघर नागरिक व आदिवासी पारधी अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top