mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Parents’ meet concluded with enthusiasm at Shivaji High School : शिवाजी हायस्कूल मध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न 

शिवाजी हायस्कूल मध्ये १३डिंसेबंर सकाळी १०वाजता पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला

उदयनगर  (प्रतिनिधी ) –  येथील शिवाजी हायस्कूल मध्ये १३डिंसेबंर सकाळी १०वाजता पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा बौद्धिक , शारीरिक ,मानसिक सर्वांगिक विकास व्हावा .विद्यार्थी ,शिक्षक,  पालक यांच्यात समन्वय रहावा. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पाल्यांचा बौद्धिक विकास होऊन त्यांना पालकांचा हातभार लागावा.  मार्चमध्ये होऊ घातलेल्या दहावी ची परीक्षा विद्यार्थ्यांना सोपी जावी म्हणून त्याअगोदरची तयारी पालकांकडून करून घेण्याच्या उद्देशाने हा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मुलीनी शाळेत येत असताना शाळेतुन घरी जात असताना निडरपणे व शिस्तीत वावरावे . ठाणेदार निखिल निर्मळ  अमडापुर पोलीस स्टेशन 

या पालक मेळाव्याचे  अध्यक्ष मुख्याध्यापक नंदकिशोर बोडखे, उपमुख्याध्यापक नरवाडे ,खराटे , प्रमुख अतिथी अमडापुर पोलिस ठाण्याचे , ठाणेदार निखिल निर्मळ, पत्रकार रघुनाथ गवई, दिपक अंभोरे,पंढरी गोराडे, प्रमोद आठवले,काळे ताई चवरे ताई,शालीनी अंभोरे ,  गजानन आराख, सुनील नाडे, विनोद धाडवे,सह असंख्य पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तलवारे ,काकडे मिसाळ ,दिनघु ,दांदडे मॅडम, झुंजारे मॅडम, इत्यादीनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तायडे यांनी मानले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top