mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Pictures of irregularities in schools in Dongar Khandala and Dhodap, principal absent, cleaning by students?डोंगर खंडाळा आणि धोडप येथील शाळेत अनियमिततेचे चित्र ,मुख्याध्यापक गैरहजर, विद्यार्थिनींकडून साफसफाई?

बुलढाणा (प्रतिनिधी)

डोंगर खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत काही अनियमितता आढळल्याची माहिती समोर आली आहे. शाळेला अचानक भेट दिली असता काही शिक्षक वर्गात बसलेल्या अवस्थेत दिसून आले. एका शिक्षकाने शासकीय गणवेश परिधान न करता डोक्यावर टोपी व जिन्स परिधान केल्याचे आढळले, ज्यामुळे शालेय शिस्त व नियमांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावेळी मुख्याध्यापक मीटिंगला गेले असल्याचे सांगण्यात आले; मात्र ते शाळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले. शाळेच्या परिसरात काही विद्यार्थी वर्गाबाहेर बसलेले दिसले, तर एका विद्यार्थिनीला बाहेर साफसफाई करताना पाहण्यात आले. विद्यार्थ्यांकडून साफसफाई करून घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, काही पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता चांगली असल्याचे सांगितले. ‘विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देतात, शिक्षक शिकवतात,’ असे पालकांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले जात असले तरी व्यवस्थापनातील त्रुटींवर मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, मुख्याध्यापकांच्या कार्यालयात महापुरुषांचे फोटो नसल्याचेही निदर्शनास आले. शासकीय शाळांमध्ये राष्ट्रीय नेते व महापुरुषांचे छायाचित्र लावण्याची परंपरा असताना येथे ती दिसून आली नाही. या सर्व प्रकाराबाबत शिक्षण विभागाने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

चक्क विद्यार्थ्यांकडे पाठ करून शिक्षक शिक्षिका गप्पांमध्ये मग्न-

जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये ज्ञानदानाच्ो कार्य करणारे शिक्षक व शिक्षिका चक्क विद्यार्थ्यांकडे पाठ करून गप्पात मश्गुल असल्याचे चित्रही एका ठिकाणी समोर आले आहे. हा प्रकार पाहता शिक्षकच जर ज्ञानदानाबाबत उदासिन असतील तर पालकवर्गाला आपल्या विद्यार्थ्यांची कोणती प्रगती दिसणार हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top