mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Salute to Dr. Babasaheb Ambedkar–समता,बंधुतेचा दीप प्रज्वलित: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

समता–बंधुतेचा दीप प्रज्वलित: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतावादाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अत्यंत श्रद्धेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

लोणार (प्रतिनिधी )- तालुक्यातील बिबी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतावादाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अत्यंत श्रद्धेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी स्मारकाजवळ अभिवादन सभेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावातील नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. “समता, बंधुता आणि न्याय” ही बाबासाहेबांची शिकवण आज अधिक महत्त्वाची असल्याचे अनेकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात गावातील मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन स्मारकास अभिवादन केले. विविध धर्मीय समाजबांधवांनी एकत्र येऊन व्यक्त केलेली भावना बिबी गावाच्या सांप्रदायिक ऐक्याची जिवंत उदाहरण ठरली. मानवतेचा आणि समतेचा संदेश देणारी ही उपस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या समतामूलक समाजाची जाणीव करून देणारी होती.
सायंकाळी भारतीय बौद्ध सभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शांततेत मशाल व मेणबत्ती यात्रा काढण्यात आली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी हातातील प्रज्वलित मशाली आणि मेणबत्त्यांसह यात्रेत सहभाग घेतला. “तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे…” या मंगल घोषणांनी वातावरण भारले होते. गावातील रस्ते, चौक आणि स्मारकाभोवती मेणबत्त्यांचा प्रकाश पसरताच वातावरण अधिकच भावविवश आणि प्रेरणादायी बनले.
या यात्रेच्या आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततेत आणि अत्यंत सुंदररीत्या पार पडला.
यात्रेनंतर सर्व मेणबत्त्या बाबासाहेबांच्या स्मारकावर ठेवून उपस्थितांनी शांततेत आणि आदराने श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी मा. सैनिक प्रविण इंगळे तसेच समता सैनिक दलाचे जवान ब्रम्हानंद वाकोडे आणि संतोष काकडे यांनी स्मारकास शिस्तबद्ध सलामी देत कार्यक्रमाला विशेष सन्मानाची छटा जोडली.
पुढील सत्रात आयोजित केलेल्या भीमगीत कार्यक्रमात कलाकारांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित गीतांनी उपस्थितांमध्ये प्रबोधनाची प्रेरणा निर्माण केली. शिक्षण, समता, स्वाभिमान आणि जागृती या संदेशांनी परिपूर्ण अशा गीतांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भारावून गेले. याचवेळी गायकवाड क्लासेसचे संचालक वैभव गायकवाड यांनी सायंकाळी उपस्थितांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाला वैचारिक आणि प्रेरणादायी दिशा दिली.
कार्यक्रमात सरपंचपुत्र दिपक गुलमोहर, उपसरपंच भास्कर खुळे, रियाज भाई (तंटामुक्ती उपाध्यक्ष, बिबी), पत्रकार कृष्णा पंधे, सलमान खान, महेबूब शेख, धनंजय सानप (शेतकरी मित्र), समीर सय्यद, मयूर वाकोडे (युवा नेता, अपक्ष), विकी केव्हळे, अरबाज सय्यद (सामाजिक कार्यकर्ते), मा. सैनिक प्रविण इंगळे, विनोद इंगळे, लहू हिवाळे, प्रितम काकडे, वैभव इंगळे, अश्विन निकाळजे, विशाल इंगळे, संजय साळवे, राज अंभोरे, वंदना वाकोडे, सुभद्रा हिवाळे, सविता इंगळे
विजय वाघ सर (बौद्धाचार्य), रमेश साळवे, विलास साळवे, प्रभू इंगळे, गजानन काकडे, बबन इंगळे, एकनाथ हिवाळे, भाऊसाहेब इंगळे, राहुल चव्हाण, अमोल शेषराव इंगळे, प्राशांत इंगळे, आनंद इंगळे, विलास वाकळे, राहुल वानखेडे, माधव इंगळे, प्रवीण साळवे, राहुल दामोदर इंगळे, सुनील हिवाळे, शरद साळवे, भानुदास लहाने, दीपक साळवे, मनोहर साळवे, शंकर टेकाळे, आकाश साळवे, रवींद्र हिवाळे, सुशील हिवाळे (ग्रामपंचायत अधिकारी), सुशील बनसोडे, संदीप सदावर्ते, भारत इंगळे, बंटी इंगळे, दीपक अंभोरे, अजय साळवे, संदीप इंगळे, सचिन निकाळजे, अच्युतराव इंगळे, किशोर इंगळे, गौतम साळवे, प्रवीण हिवाळे, दिलीप मगर, कुंडलिक दहिजे, संदीप पनाड, गौतम वाकळे, करण इंगळे, सागर हिवाळे, विकास वाकोडे, राहुल रतन इंगळे, विशाल सुट्टे, पंकज इंगळे, जितू शेजुळ, प्रताप इंगळे, अक्षय संजू इंगळे, शालुबाई चव्हाण, रेशीम बाई हिवाळे, रामकोरबाई इंगळे, नंदाबाई इंगळे, चंद्रभागबाई साळवे, इंदुबाई वाकळे, जनाबाई अंभोरे, शोभाबाई साळवे, पार्वती बाई हिवाळे, भारती काकडे, उषा बबन इंगळे, लताबाई जावळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीणभाऊ बनसोडे यांच्यासह अनेक समाजबांधवांची उपस्थिती होती.
बिबी गावात शिस्त आणि शांततेत संपन्न झालेला महापरिनिर्वाण दिनाचा हा कार्यक्रम केवळ स्मृतिदिनाचे आयोजन नसून समाजाला विचार, प्रेरणा आणि दिशा देणारा ठरला. बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या आणि संविधान मूल्यांच्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा सामूहिक प्रतिज्ञा या कार्यक्रमातून व्यक्त झाली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top