जाफ्राबाद रोड वरील नागसेन बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले

चिखली -(प्रतिनिधी) जाफ्राबाद रोड वरील नागसेन बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध , महामानवाच्या प्रतिमांचे पूजन करून समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंगोले ,तालुकाध्यक्ष सदाशिव खिल्लारे, दीपक कस्तुरे, समता सैनिक दलाचे मेजर एकनाथ बोर्डे ,विलास जाधव वंचित चे शहर अध्यक्ष बाळू भिसे, ता. सचिव जितु निकाळजे, पंजाबराव निकाळजे ,कोलारा समता सैनिक दल ,गजानन नगर समता सैनिक दल, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Please follow and like us:


