
चिखली (प्रतिनिधी) दि.19: तालुक्यातील सातगाव भुसारी येथे शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडली. गावकरी आणि युवा मंडळी यांनी एकत्रितपणे येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त
सांस्कृतिक कार्यक्रम,लहान मुलांचे भाषण ,जिजाऊ, सावित्री, रमाई यांची वेशभूषा,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर भाषणे ,विद्यार्थ्यांसाठी निबंधक स्पर्धा, धावण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.गावांमधील सर्व जाती धर्माचे लोक सामील शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सातगाव भुसारी येथील शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि एकतेचे दर्शन घडवले.
Please follow and like us:


