mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Special survey campaign under National Leprosy Eradication Programme in Buldhana districtLeprosy survey and health check-up of laborers in Tambulwadi Vitabhatti area: बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष सर्वेक्षण मोहीम

तांबूलवाडी वितभट्टी परिसरात मजुरांचा कुष्ठरोग सर्व्हे व आरोग्य तपासणी

बुलढाणा/ प्रतिनिधी  

तांबूलवाडी वितभट्टी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा येथील आरोग्य सेवक प्रा. दीपक भीसे व आशा सेविका कल्पना नागपुरे यांनी मजुरांचा कुष्ठरोग सर्व्हे करून आरोग्य तपासणी केली. यावेळी मजुरांना कुष्ठरोगाबाबत माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणे व उपचारांविषयी सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले. या उपक्रमासाठी अमोल गिते (जिल्हा आरोग्य अधिकारी), सहाय्यक संचालक कुष्ठरोग, बुलढाणा, कु. अनुराधा गारोडे (वैद्यकीय अधिकारी),  संजय इंगळे (आरोग्य सहाय्यक),  विजय जाधव (आरोग्य सहाय्यक),  ऋषिकेश कणखर (तालुका आरोग्य अधिकारी) तसेच  गायकवाड  (अवैद्यकीय सहाय्यक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व्हेमुळे मजुरांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढून संभाव्य रुग्णांची लवकर ओळख व योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा बुलढाणा येथे “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र” व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५-२६ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ३० जानेवारी ते दि. १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “कुष्ठरोगाकरिता विशेष सर्वेक्षण मोहीम” आयोजित करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट निश्चित केले असून, समाजातील सर्व घटकांमधील लपलेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना वेळेवर उपचार देणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वेक्षणामध्ये वीटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर, निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी, कंपनीत काम करणारे कामगार आदी घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कुष्ठरोग हा अनुवंशिक नसून, तो मागील जन्माचे पाप, देवाचा शाप किंवा कोणाची करणी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शरीरावर फिकट/लालसर रंगाचे चट्टे, त्या ठिकाणी सुन्नपणा, हातापायातील संवेदना कमी होणे, नसांच्या मार्गावर सूज येणे, न बरे होणाऱ्या जखमा अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कुष्ठरोगावर मोफत व प्रभावी औषधोपचार सर्व शासकीय व निमशासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असून, वेळेवर निदान व उपचार केल्यास अपंगत्व टाळता येऊ शकते. सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील संशयित रुग्णांची माहिती देऊन व स्वतः तपासणी करून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), बुलढाणा यांनी केले आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top