
चिखली( प्रतिनिधी)
तालुक्यातील सवणा येथे आज दि.२२ जानेवारी २०२६ रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ चे उद्घाटन अतिशय थाटामाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री पद्माकर भाऊ भुतेकर, अध्यक्ष श्री चंदन शेष क्रीडा मंडळ सवणा, प्रमुख पाहुणे मा श्री प्रवीणजी वायाळ, गट समन्वयक पंचायत समिती चिखली, मा श्री कैलास करवंदे सर, मा श्री दीपकभाऊ खडके, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,मा श्री बळीराम भुतेकर सर,केंद्रप्रमुख मा श्री पी टी केवट , मा .श्री .जी. टी सवडतकर , मा श्री मुकीम पटेल , मा श्री वानखेडे ,मा श्री सुरडकर ,मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. क्रीडा समन्वयक मा.श्री राजेंद्र भुतेकर तथा उपक्रिडा समन्वयक मा श्री सोमकांत साखरे यांनी जबाबदारी सांभाळली. चांधई येथील श्री गणेश भुतेकर यांच्या विद्यार्थ्यांनी ‘ जय जय संतोषी माता ‘ गाण्यावर अतिशय सुंदर अतिशय अवघड गोप नृत्य सादर करुन सगळ्यांची मने जिंकली. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक डॉ. मुकीम पटेल यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री प्रवीण वायाळ व श्री कैलास करवंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री मोबीन शेख यांनी केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन धावण्याची शर्यत, खोखो तथा कबड्डी खेळांची सुरुवात झाली. याप्रसंगी अनेक प्रतिष्ठित गावकरी, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.क्रीडांगणाची जबाबदारी तथा पंच म्हणून श्री चंदनशेष क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक,सदस्य,विद्यार्थी यांनी मदत केली


