

धाड, (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरकडून बुलढाणा मलकापूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली धाड नजिकच्या करडी फाट्याजवळ मोटरसायकल बस खाली येऊन चिरडल्या गेल्याने तिघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ५ जानेवारीच्या ४.५० च्या दरम्यान घडली आहे.
करडीच्या (धाड) पुलावर हा अपघात झाला मलकापूर आगाराची ही बस क्रमांक एमएच-०६-बीडब्ल्यू-३६३८ छत्रपती संभाजीनगरवरुण मलकापूरला जात होती.बस सायंकाळी ४.५० मिनिटांनी करडी (धाड) येथील पुलावर येताच या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याचं कळतंय.
. ढाल सावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे मोटारसायकलवर स्वार होऊन धाडवरून कराडीच्या दिशेने जात होते. बस सायंकाळी ४.५० मिनिटांनी करडी (धाड) येथील पुलावर येताच या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. नव्हेतर दुचाकी चुरा होऊन बसखाली घुसली. यामध्ये दुचाकीस्वारांना गंभीर मार लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यातील एकाच्या डोक्याची कवटी फुटून त्याचा मेंदू अक्षरशः बाहेर पडला. या दुर्दैवी घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे.


