
बुलढाणा(प्रतिनिधी )
-बातमीचे हेडिंग वाचून तुम्हाला ही धक्काच बसला असेल परंतु खर आहे, ज्ञानगंगा अभयारण्य मध्ये मागील काही दिवसात एक वन्यप्राणी वाघ सोडण्यात आला होता. हा वन्य प्राणी वाघ चिखली तालुक्यातील वैरागड ,टाकरखेड आणि करवंड या शिवारात काही नागरिकांना दिसून आल्याची बातमी मूकनायक वार्ता कडे प्राप्त झाली होती मात्र मूकनायक वार्ता च्या टीमने वनाधिकारी यांच्याकडे संपर्क केला असता वाघ अजून शेत शिवारामध्ये नसल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले आहे. तरीही परिसरातील शेतकऱ्यांनी,नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.
वन्यप्राणी वाघ करवंड बीट व वैरागड बीट चे हद्दी वर वनखंड क्रमांका मध्ये आज सकाळचे लोकेशन आहे त्यामुळे तो अजून जंगल क्षेत्रात आहे शेत शिवारात आलेला नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाना यांनी केले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी


