mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Tree plantation in Mokshadham area of Takarkhed(Md.) : टाकरखेड( मु.)  येथील मोक्षधाम परिसरात वृक्षारोपण 

आजच्या युगात झाडे लावने हि काळाची गरज- सरपंच सौ. लताताई डहाके

चिखली (प्रतिनिधी) –  6 जानेवारी विकास कामे करत असतांना प्रत्येक ठिकाणी झाडांची कत्तल होते, जेव्हडी झाडे तोडल्या जातात. तेव्हडी झाड़े लावल्या जात नसून, त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर दिसू नये.झाडे मानवासाठी ऑक्सीजन देतात असे मत चिखली तालुक्यातील ग्राम टाकरखेड च्या सरपंचा सौ. लताताई ज्ञानू डहाके यांनी दि.४ जानेवारी रोजी स्मशान भुमी ये थे वृक्षारोप लागवडी कार्यक्रमा वेळी व्यक्त केले . मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत टाकरखेड मु.  येथील हिंदू स्मशानभूमी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व हरित ग्रामविकासाच्या उद्देशाने नविन वर्षाचे औचित्य साधून टाकरखेड ग्राम. पचायतने हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या  वृक्षांची लागवड करण्यात आली. स्मशानभूमी परिसर स्वच्छ, हिरवागार व शांत राहावा तसेच भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड उपयुक्त ठरेल, या कार्यक्रमास सरपंच सौ . लता ज्ञानेश्वर डहाके, उपसरपंच तेजराव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, प्रलय खरात ग्रा. पं. अधिकारी माने मॅडम    पोलिस पाटील अंनथा वाघ तंटामुक्तिअध्यक्ष ज्ञानबा खेंन्ते सामाजिक कार्यकर्ते समाधान खेंन्ते माजी सरपंच भागवत खेंन्ते पुरुषोत्तम खपके, ग्रा.प.शिपाई राम थोरात आणि जलसुरक्षक उद्धव गाडे  नंदकिशोर रसाळ  अंगद खेंते कर्मचारी शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत नियमित देखभाल करण्याचा संकल्प केला.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top