mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Two injured in serious accident on Amdapur-Chikhali highway   अमडापूर-चिखली महामार्गावर  भीषण अपघात दोन जण जखमी 

चिखली मार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले. ही घटना 9 डिसेंबर रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अमडापूर, टाकरखेड ग्रामस्थांनी  घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनाबाहेर काढले. अंबुलन्स ला कळून उपचारासाठी चिखली येथील  रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी मदत केली.

अमडापूर– (प्रतिनिधी) – चिखली मार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले. ही घटना 9 डिसेंबर रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अमडापूर, टाकरखेड ग्रामस्थांनी  घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनाबाहेर काढले. अंबुलन्स ला कळून उपचारासाठी चिखली येथील  रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी मदत केली.

टाकरखेड हेलगा येथील राजेश नामदेव हिवाळे वय 33 हे चिखलीकडून अमडापूरच्या दिशेने एम एच २८ बी ओ ३११५ वेगनार कारने येत होते. त्याच वेळी सावरखेड येथील एम एच १२ जी एफ ७५३ क्रमंकाची अल्टो कार अमडापूरहून चिखलीकडे जात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अल्टोमधील आकाश  सुरुशे तसेच वेगनार कार चालक हिवाळे व आणखी एक जण जखमी झाला असून तिघांवर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top