मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांच्या हस्ते सपन्न! आई बेबीताई रमेश पवार यांचा वाढदिवस साजरा!



बुलडाणा – ( प्रतिनिधी) संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने पवित्र ठिकाण असलेल्या स्थळापैकी बुद्धगया येथे जाऊन कुशल कर्मास प्राप्त झालेल्या धम्म उपासक तथा उपासिकांचा मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी बुलढाणा येथे पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. बुलडाणा शहरातील चिखली रोड चांडक ले आऊट बुलडाणा येथे सतीश पवार यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात बोलताना बोलतांना सतीश पवार म्हणाले की, स्वामी तिन्हीं जगाचा आई विना भिकारी ! आई ज्याला नाही त्याला आईची किंमत माहित नाही, आई ज्याला आहे त्याला पण आईची किंमत माहित नाही ,आजच्या काळामध्ये आई ही अडचणीची वस्तू घरामध्ये होत आहे का ? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला . आईसाठी घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था काही लोक करतात. परंतु आजची पिढी आई-वडिलांना सांभाळत नाही, हे पाहून मनाला यातना होतात म्हणून असं वाटलं की समाजासमोर आपण आपल्या आई वडिलांचे समाजामध्ये जाऊन वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे , युवा पिढीने याचा आदर्श घ्यावा.आईचा वाढदिवसाच्या निमित्ताने ते बोलत होते.पुढे बोलताना बोलतांना ते म्हणाले की, ज्ञानप्राप्तीचे ठिकाण असलेली भूमी जिथे तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी कठोर तपश्चर्येनंतर सत्याची जाणीव करून निर्वाण प्राप्त केले, ती भूमी बुद्धगया त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा पाया रचला गेला. ऐतिहासिक भूमी बोधगया हे लुंबिनी, सारनाथ, कुशीनगरसह बौद्ध धम्माच्या चार प्रमुख ठिकाणांपैकी एक महत्वाचे ठिकाण आहे.आहे. हे केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तर बौद्ध तत्वज्ञान आणि चळवळीसाठी ऊर्जा देणारे आहे ऐतिहासिक ठिकाणाने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला असून जागतिक वारसा स्थळ आणि बौद्ध धम्मामध्ये महत्वाचे श्रद्धा आणि शांतीचे प्रतीक आहे. जिथे जगभरातून लोक ज्ञान आणि शांतीचा शोध घेण्यासाठी येतात. या पवित्र ठिकाणांहून परतलेल्या धम्म उपासक उपासिका यांच्या भिक्खू संघाच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.यावेळी समाधान जाधव, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव , संघर्ष जाधव यांनी देखील मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे संचालन प्रा. कडुबा पैठणे यांनी केले.


