mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Youth from Karwand selected in Central Reserve Police Force :   करवंड येथील युवकाची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड

बुलढाणा ( प्रतिनिधी)- चिखली  तालुक्यातील करवंड येथील निलेश वसंता मोरे या युवकाची नुकतीच केंद्रीय राखीव पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. दि.१५.०१.२६ ला केंद्रीय राखीव दलाची यादी जाहीर झाली आणि नवीन वर्षाची भेट त्याने आई वडिलांना दिली. युवकाचे प्राथमिक शिक्षण करवंड येथील जिल्हा परिषद मराठी शाळा करवंड येथे तर माध्यमिक शिक्षण बजरंग विद्यालय टाकरखेड हेलगा येथे,तर पुढील शिक्षण त्यांनी कोठारी कॉलेज नांदुरा येथे पूर्ण केले. बी.एस.सी पदवीचे शिक्षण त्याने मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे पूर्ण केले असल्याची माहिती त्याने मूकनायक वार्ता ला दिली. सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला हा तरुण घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे परिस्थितीवर मात करत त्याने अखेर यश संपादन केले आहे.
या यशाचे श्रेय तो आपल्या आई-वडिलांना ,काका काकू आणि शिक्षकांना देतो, आई वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. परंतु आई-वडिलांनी मुलाला शिकवलं मोठ केलं आणि या शिक्षणाचा फायदा घेत त्याने अतिशय मेहनत, जिद्द आणि सातत्य ठेवले परिस्थिती त्याने कधीही आड येऊ दिली नाही, घरची परिस्थिती त्याने ओळखली परिस्थितीवर मात करत अखेर त्याने विजय मिळवला तो दिवस उजाडला आणि केंद्रीय राखीव दलात त्याची निवड झाली परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


असं म्हणतात ना. लहरो से डर कर नौका पार नही होती और मेहनत करने वालों की कभी हार नही होती.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top