
चिखली (प्रतिनिधी ): येथील न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री. खान यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तरुणांना उद्याचे सक्षम नागरिक बनण्यासाठी थोर महामानवांना आदर्श मानून त्यांचे विचार आत्मसात करावे यासह जागरूक नागरिक बनण्यासाठी वाचनाकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. दि.9जानेवारी 2026 रोजी रामसिंह चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात उपस्थित तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले. विधी सेवा समिती चिखली वकील संघ चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिबिरात तरुणांना त्यांची सामाजिक जबाबदारी, कायद्याचे ज्ञान व भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य यांची जाण करून देण्यात आली .शिबिरात मा जिजाऊ ,स्वामी विवेकानंद ,धन्वंतरी देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर चिखली वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट सतीश गवई, प्राचार्य डॉ. श्रीमती गुल्हाने ,सचिव प्रेमराज भाला, प्रा. डॉक्टर पंकज शेटे, ॲड .राधिका मीनासे गणोजेकर, ॲड .जावेद चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. या शिबिरात विविध कायद्याविषयी माहिती कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ॲड .राधिका मीनासे यांनी बालकावरील लैंगिक अत्याचार विरोधी संरक्षण कायदा याविषयी माहिती दिली . ॲड.किरणकुमार हनवते यांनी रस्ता वाहतूक नियम व अधिनियम तरुण विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ॲड .विद्याधर गवई यांनी तडजोड संबंधित कायद्याची माहिती दिली तर ॲड .अंबादास जाधव यांनी सायबर गुन्हे विषयी मोबाईल धारकांनी कसे जागरूक असावे याबद्दल माहिती दिली.ॲड रूपाली चौधरी यांनी अमली पदार्थ सेवन बद्दलचे कायदे स्पष्ट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी गायत्री जाधव कुमारी पायल पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य श्रीमती डॉक्टर गुल्हाने यांनी केले यावेळी कार्यक्रमास 180 विद्यार्थी वकील संघाचे सदस्य ॲड .रंजना पट्टे ॲड .डोंगरदिवे न्यायालयीन कर्मचारी राजेश आगमे ,देशमुख महाविद्यालयाचे प्रा, डॉ. पंढरीनाथ इंगळे व कर्मचारी उपस्थित होते.


