बुलढाणा मलकापूर रोडवर गुलाबचंद नगर परिसरात आज (7 डिसेंबर) दुपारी वेळी एक घटना समोर आली आहे. बिनीश्याम अग्रवाल यांच्या शेतातील पडक्या विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली.

बुलढाणा – मलकापूर रोडवर गुलाबचंद नगर परिसरात आज (7 डिसेंबर) दुपारी वेळी एक घटना समोर आली आहे. बिनीश्याम अग्रवाल यांच्या शेतातील पडक्या विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिस स्टेशनची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस व स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. घटनेतील मृत व्यक्तीची ओळख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही हत्या आहे का अपघात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहे. अज्ञात मृतदेह सापडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे.


