पीडितेच्या मैत्रिणीने व्हिडीओ कॉल केला रेकॉर्डिंग : व्हायरल झाल्यानंतर घटना उघड : मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखलमाझ्याकडे पॉलीचे बुक आहे, नोट्स देतो, प्रॅक्टिकलचे गुणही वाढवून देण्यास सांगतो, या बहाण्याने सोळावर्षीय विद्यार्थिनीस घरी बोलावून नराधम शिक्षकाने तिच्या बलात्कार केला.

बुलढाणा : माझ्याकडे पॉलीचे बुक आहे, नोट्स देतो, प्रॅक्टिकलचे गुणही वाढवून देण्यास सांगतो, या बहाण्याने सोळावर्षीय विद्यार्थिनीस घरी बोलावून नराधम शिक्षकाने तिच्या बलात्कार केला. या अश्लाघ्य प्रकाराचा पीडितेच्या मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून स्क्रीन रेकॉर्डींग करायला लावले. ही धक्कादायक, तितकीच घृणास्पद घटना मलकापूर शहरात ऑक्टोबर महिन्यात घडली. पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास विरोध केल्यानंतर त्या मुलीने व्हिडीओ व्हायरल केल्याने ही घटना समोर आली. या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि मुलीच्या मैत्रिणीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
मुकेश परमसिंग रबडे (वय ४०) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो मोताळा तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी आहे. तर शिक्षकाने केलेल्या गुन्ह्यात सहभागी असलेली सोळावर्षीय आरोपी मुलगी नांदुरा तालुक्यातील एका गावामधील रहिवासी आहे.
पीडित मुलगी ही शिक्षकाला ओळखत होती. शिक्षक रबडे याने विद्यार्थिनीला कॉल करून ‘माझ्याकडे पॉलीचे बुक आहे, नोट्स आहे ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टीकलचे मार्क वाढवून देण्यास सांगतो’ म्हणत २९ ऑक्टोबरला मलकापूर तहसील चौकात बोलावून घेतले. नंतर तिला एका रूमवर नेले. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. तु व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आणि मुलीने त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षक करीत असलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले.
विरोध केल्याने मारहाण
विरोध केला असता आरोपीने पीडितेस मारहाणही केली. दुसऱ्या दिवशी २९ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता चौकात सोडून दिले. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास तुला, वडिलांना आणि भावाला जीवे मारून टाकेन तसेच तुझा रात्रीचा व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या.
कॉल उचलणे बंद केल्याने व्हिडीओ व्हायरल
या प्रकारानंतर अधूनमधून आरोपीने तिला फोन कॉलही केले. मुलीने त्याचे कॉल न घेतल्याने आठ दिवसांपूर्वी आरोपी मुलीने व्हिडीओ कॉल स्क्रिन रेकॉर्डिंग व्हायरल केले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीला धीर देत कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.