mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Yuva Shahir Sanghpal Gavai’s appointment as Vidarbha organizer of Folk Artist Enlightenment Council, Maharashtra State Organization… Congratulations from all levels :  युवा शाहिर संघपाल गवई यांची लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या विदर्भ संघटक पदी नियुक्ती… सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव 

बुलडाणा / प्रतिनिधी 

भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालय, गीत व नाटक प्रभाग च्या केंद्रीय संचार ब्युरो पुणे अंतर्गत नोंदणीकृत व कार्यरत असलेल्या कला संचाची मातृसंघटना पुणे येथे नोंदणीकृत लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या विदर्भ संघटक पदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा शाहिर, कवी गायक शाहिर संघपाल गवई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

युवा लोकशाहीर संघपाल गवई यांनी दिवंगत शाहिर केशव गवई यांचेकडून लोककलेचे धडे घेऊन शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेत कला क्षेत्रात उत्कृष्ट सादरीकरण करीत आहेत. 

ग्रामीण भागासह महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम करीत जनजागृती करीत आहेत.

लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष शाहिर सुभाष गोरे, राज्य कार्याध्यक्ष शाहिर डी.आर.इंगळे, राज्य सचिव शाहिर बाळासाहेब मालुसकर, संचालक शाहिर उत्तम गायकर यांचे मार्गदर्शनात राज्य समन्वयक प्रा. शाहिर गजेंद्र गवई यांनी एका पत्राद्वारे शाहिर संघपाल गवई यांची विदर्भ संघटक म्हणून नियुक्ती केली आहे. 

संपूर्ण विदर्भातील ११ हीं जिल्ह्यात ग्रामीण भागातील शोषित, वंचित, उपेक्षित कलावंताचे गाव शाखा ते जिल्हा कार्यकारणी बांधणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात विविध लोककला सादर करून लोककला जिवंत राहील यासाठी लोककलावंताचे संघटन करून विविध न्यायिक हक्क अधिकार बाबत जागृत करून संघटनेचे उपेक्षित वंचित कलावंत यांना संघटनेचे सभासद करून घेणे व संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्तीबबद्दल शाहिर संघपाल गवई यांचे भीमशक्ती चे राज्य नेते भाई कैलास सुखधाने, जेष्ठ आंबेडकऱी नेते सोपानराव देबाजे, सम्यकक्रांती सोशल फोरम, महाराष्ट्र राज्य समस्त पदाधिकारी यांचे वतीने विशेष अभिनंदन केले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रभरातून कला क्षेत्रातील कवी, गायक, वादक, शाहिर,  सामाजिक कार्यकर्ते अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top