mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Tributes to Gadge Baba at Mukul Wasnik Law College: मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात  गाडगेबाबा  यांना अभिवादन 

बुलडाणा – (प्रतिनिधी) विदर्भ युवक विकास संस्था व्दारा संचालित मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात  आज दि. २० डिसेंबर, २०२५  ला गाडगे महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवाद करण्यात आले. महाविद्यालयाच्या  प्र.प्राचार्या शिल्पा ठाकरे यांनी प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्या शिल्पा ठाकरे यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तर  प्रा. अँड संतोष वानखेडे यांनी संत गाडगे बाबा यांनी अज्ञान, अंधश्रध्दा, जातीवाद आणि अस्वच्छतेविरुध्द लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.  प्रत्येक व्यक्तीने संत गाडगे बाबा यांच्या लढयावर कार्य करावे असे विचार त्यांनी व्यक्त केले.   कार्यक्रमास प्रविण नवघरे, शैलेश खेडकर, अमोल लहाने, चेतन उबरहंडे, विजयसिंग हाडे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top