मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे थोर समाजसुधारक, संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बुलडाणा : (प्रतिनिधी)– येथील मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा येथे थोर समाजसुधारक, संत व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना स्वच्छता, सेवा, शिक्षण व सामाजिक समतेचा संदेश अधोरेखित केला. “समाज परिवर्तनासाठी केवळ उपदेश नव्हे तर कृती आवश्यक आहे, हे संत गाडगे बाबांच्या कार्यातून स्पष्ट होते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रा. बलवंत विणकर तसेच डॉ. प्रा. मनीषा राऊत यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगे बाबांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता विशद केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीला दाभाडे रोकडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. समृद्धी गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. विद्या म्हळसने, प्रा. शिल्पा सादतकर, प्रा. महेश व्यवहारे, प्रा. धनंजय साखरे, प्रा. अर्चना पाटील, प्रा. प्राजक्ता काळे, प्रा. अंजली लांडकर, मंगेश जोशी, मामू तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबा यांच्या विचारांचा परिचय होऊन सामाजिक बांधिलकी, स्वच्छता व सेवाभावाची प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
