
मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांचे आयोजन

बुलडाणा – ( प्रतिनिधी) संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने पवित्र ठिकाण असलेल्या स्थळापैकी बुद्धगया येथे जाऊन कुशल कर्मास प्राप्त झालेल्या सर्व धम्म उपासक तथा उपासिकांसाठी मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी बुलढाणा येथे पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये २७ डिसेंबर २०२५ वार शनिवारला सायंकाळी ४.३० वा. भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतिश पवार यांनी केले असून बुलडाणा शहरातील चिखली रोड चांडक ले आऊट बुलडाणा येथे सतीश पवार यांच्या निवासस्थानी भोजनदानाचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलतांना सतीश पवार म्हणाले की, ज्ञानप्राप्तीचे ठिकाण असलेली भूमी जिथे तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी कठोर तपश्चर्येनंतर सत्याची जाणीव करून निर्वाण प्राप्त केले, ती भूमी बुद्धगया त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा पाया रचला गेला. ऐतिहासिक भूमी बोधगया हे लुंबिनी, सारनाथ, कुशीनगरसह बौद्ध धम्माच्या चार प्रमुख ठिकाणांपैकी एक महत्वाचे ठिकाण आहे.आहे. हे केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तर बौद्ध तत्वज्ञान आणि चळवळीसाठी ऊर्जा देणारे आहे ऐतिहासिक ठिकाणाने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला असून जागतिक वारसा स्थळ आणि बौद्ध धम्मामध्ये महत्वाचे श्रद्धा आणि शांतीचे प्रतीक आहे. जिथे जगभरातून लोक ज्ञान आणि शांतीचा शोध घेण्यासाठी येतात.
