बुलढाणा जिल्हा परिषद मुख्याधिकारी गुलाबराव खरात यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

बुलढाणा / प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील वरखेड गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेने यावर्षीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुका व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेतील एकूण ३७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशाची दखल जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आज विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी ‘व्हिडिओ कॉल’द्वारे थेट संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर शाळांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे हे यश माझ्या मार्गदर्शनात व माझ्या कारकिर्दीत होत असल्याचा मला विशेष आनंद होत असल्याचे उदगार मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी काढले. यावर्षी तब्बल २८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. यामध्ये प्राजक्ता गवई, आरती कस्तुरे, विद्या लहाने, अनुष्का भगत, समिक्षा भगत, रुतुजा म्हळसणे, पुनम म्हळसणे, पायल खरात, खुशी गायकवाड, श्रावणी गायकवाड, वैष्णवी येळवंडे, नव्या देवकर , अनुष्का अंभोरे, तनिषा तांबट, श्रेया गोजरे, नंदिनी सिरसाट, मयुरी धमक, अमृता वाकडे, यश गवई, करण वाघमारे, यश रंदील, प्रिन्स सरकटे, सुदीप वानखेडे, हरीश कणखर, सुरज तुपकर, आदित्य मुंढे, उदय झगरे, मयूर सपकाळ हे विद्यार्थी परीक्षेमद्धे पात्र झाले ही कामगिरी शाळेच्या इतिहासातील अभिमानास्पद ठरली आहे. तसेच त्यांचे वर्गशिक्षक शुभम बुरकुल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या यशामागील सूत्रे मुख्याध्यापकांचे प्रभावी नेतृत्व, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व विशेष सराव वर्ग, विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी व मेहनत, पालकांचे, शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य तसेच गावकर्यांचे सहकार्य. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे, प्रश्नपत्रिका सराव, शंका निरसन वर्ग व नियमित चाचण्या घेतल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. या यशाबद्दल ग्रामस्थ, पालकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवून दाखवले, अशी भावना व्यक्त होत आहे. ही कामगिरी केवळ शाळेची नसून संपूर्ण वरखेड गावासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही अशीच शैक्षणिक प्रगती होत राहो, अशी सर्वांची अपेक्षा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. ९ वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या या कठीण परीक्षेत अनुष्का प्रवीण अंभोरे (वर्ग ८ वी) ऑल इंडिया रँक६५३१, श्रेया गोजरे ऑल इंडिया रँक ९९८७ या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करून मुलाखतीसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
शाळेचे वैशिष्ट्ये- वरखेड शाळेमध्ये शेजारच्या परिसरातील एकूण २२ गावचे ४६५ विद्यार्थी शाळेत येतात. NMMSमध्ये ३७ पैकी २८ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्र जिल्ह्यातून सर्वोत्तम निकाल.ASSIEE सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा मध्ये २ विद्यार्थिनींची निवड. पश्चिम विदर्भातील पहिली ISO शाळा महाराष्ट्र राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ उपक्रम अंतर्गत १३ शाळांमधून वरखेड शाळेची निवड.अतिरिक्त CBSE अभ्यासक्रम राबवणारी एकमेव शाळा.
खेळामध्ये विविध नैपुण्य – बुद्धिबळ स्पर्धेत विभाग स्तरावर मजल. २. बॅडमिंटन मध्ये जिल्हास्तरावर निवड. खोखोमध्ये मुले व मुली जिल्हास्तरावर निवड. कबड्डी संघ जिल्हास्तरावर निवड. मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, वर्ग ७ वी च्या पाच विद्यार्थ्यांची निवड. MPSC-UPSC आधारित स्पर्धा परीक्षा माध्यमातून वर्षभरात एकूण ४००० प्रश्नांची तयारी. JEE ,NEET वर आधारित सायन्स अँड मॅथ फाउंडेशन क्लासेस . वर्ग १ ते ८ साठी मंथन बी टी एस यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन व विशेष मार्गदर्शन. वर्ग पाचवा विशेष नवोदय क्लासेस. सुसज्ज वाचनालय. नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र. रोबोटिक लॅब द्वारे शिक्षण यासारखे विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उद्याच्या स्पर्धेसाठी तयार करणार्या शाळेचे मेहनत घेणार्या शिक्षकांचे त्यांना सहकार्य करणार्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.
.


