mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Mooknayak Varta | Impact of the Report

“Just a couple of raindrops and an ‘Arabian Sea’ on Chikhli Road… The administration finally wakes up!”: मूकनायक वार्ता | बातमीचा इम्पॅक्ट

पावसाचे दोन थेंब अन् चिखली रोडवर ‘अरबी समुद्र’… अखेर प्रशासनाला जाग!”

बुलढाणा( प्रतिनिधी):मूकनायक वार्ताने “पावसाचे दोन थेंब अन् चिखली रोडवर ‘अरबी समुद्र’ – वाहनधारक, पादचारी त्रस्त” या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे.

बुलढाणा-चिखली रोडवर डॉ. गोडे यांच्या घराजवळ पावसाचे पाणी साचून रस्त्याचे तळ्यात रूपांतर झाले होते. या संदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.


बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही तासातच जेसीबी घटनास्थळी दाखल झाला. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा ठरणारी माती आणि कचरा हटवून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

जनतेच्या प्रश्नाला मिळाला न्याय
ही फक्त रस्त्याची बातमी नव्हती. ही जनतेच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न होता. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने मोठा अपघात टळला आहे.

मूकनायक वार्ता जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत राहील आणि प्रशासनाला जाबही विचारत राहील. कारण “बातमीचा इम्पॅक्ट म्हणजेच जनतेचा विजय!”

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top