बुलढाणा (प्रतिनिधी) : दि. 9 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कृषी कर्जाशी संबंधित सर्व माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. कर्ज खाते, आधार क्रमांक, बँकेतील तपशील आणि इतर आवश्यक माहितीमध्ये विसंगती असल्यास लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.योजनेत निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार पात्र कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार असून, माहितीची विविध स्तरांवर पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी संबंधित बँक किंवा संस्थेकडे आवश्यक माहिती योग्य प्रकारे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल पडताळणीसह विविध प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. बँका आणि संबंधित संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पात्रतेची खातरजमा केली जाईल.पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी संबंधित नोंदी वेळोवेळी तपासाव्यात. आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करून घ्यावी. योग्य माहिती आणि वेळेत आवश्यक पूर्तता केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.राज्य शासनाची ही योजना पात्र शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जातून दिलासा देतानाच भविष्यातील आर्थिक व्यवहार अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा.
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme: Eligible farmers should keep the necessary information updated: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी
Please follow and like us:
