
चिखली (प्रतिनिधी): गुणवंताबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहस 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि. 15 एप्रिल रोजी चिखली विधानसभेच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मदतीने होणार असणारा नियोजित करवंड मोहोत्सवाच्या तयारीस वेग आला आहे.आज दिनांक 4 एप्रिल रोजी चिखली तहसीलचे तहसीलदार विजय सवडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, बी. डी. ओ. श्री वाघ, करवंड मोहोत्सव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख याच्यासाह मंडळ अधीकारी श्री सरागे, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनासोबत गावकरीही मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी झाले असल्यामुळे ह्या मोहोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. आज तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत आज मोहोत्सव स्थळाची पाहणी करून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.


