
बुलडाणा(प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी महाराणी गुणवंताराणीसाहेब ह्या मुळच्या चिखली तालुक्यातील बावन्नबुरजी म्हणजेच आजचे करवंड येथील सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह दि. १५एप्रील १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत झाला होता.
१५ एप्रिल ह्या दिवसाचे औचित्य साधून बावनबुर्जी बचाव कृती समितीच्या वतीने दि. १५ एप्रिल २०२६ रोजी करवंड महोत्सव आयोजित करण्याचे ठरले.यासाठी बैठकीचे आयोजन दि.४जानेवारी रोजी करवंड येथे आयोजित करण्यात आले होते. बैठकीस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या धर्तीवर करवंड महोत्सव यशस्वी करण्याचा संकल्प करून छञपती शिवाजी महाराज व गुणवंताराणीसाहेब यांच्या विवाह सोहळ्याची अनुभूती महोत्सवाच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा करून देण्याचा निर्धार केला.यावेळी राजे हरिरूद्रप्रसाद इंगळे,चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, मराठा सोयरीक चे समन्वयक सुनिल जवंजाळ, आनंदी गृपचे समन्वयक प्राचार्य अन्नासाहेब म्हळसने,देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती गणेशराजे जाधव,जिजाऊ जन्मोत्सवाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.नाईकवाडे ,युद्धभूमी आसई ता. भोकरदन येथील सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. दिलीपराव पाटीलइंगळे, प्रल्हाद पाटील इंगळे, शिव व्याख्याते कृष्णा पाटील इंगळे, माजी सभापती अंकुशराव वाघ, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऎडव्होकेट विजय सावळे, मराठी पञकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, इतिहास संशोधक रामेश्वर शेडगे, चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती मोहनराव जाधव, माजी सरपंच प्रकाश चव्हाण, भास्करराव आढळकर, नारायण सुर्वे,साभाष करंडे,सुनिल करंडे,जगदीश सपकाळ,पंढरीनाथ गुंजकर,प्रा.निलेश इंगळे,प्रा.डिगांबर कानडजे, रिसोड येथील बबनराव मोरे, डॉ. तेजराव नरवाडे, पोलीस पाटील विठ्ठल पीवळ प्रा. अनिल हेलगे,राजेंद्र रिंढे,संजय रिंढे,राम इंगळे यांचेसह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी महोत्सवाची जय्यत तयारी करणेसाठी आयोजन समितीचे गठण करून पुढील नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय घ्याळ यांनी केले तर आभार श्याम देशमुख यांनी मानले


