
अमडापूर ( प्रतिनिधी )
चिखली तालुक्यातील ग्राम टाकरखेड ( मु ) येथे दि . 13 जानेवारी रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शासनाच्या वतीने ग्रामपंचायत टाकरखेड (मु.), तालुका चिखली, येथे ह. भ. प. शिवलीलाताई पाटील यांचे समाजप्रबोधनात्मक कीर्तन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता ।
चरणी जगन्नाथ चित्त ठेले ॥
या संत श्री एकनाथ महाराज यांच्या अभंगातून निरूपण करतांना ताईने शासनास अपेक्षित ग्रामस्वच्छता, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन, पाणीसाक्षरता, संस्कार, सामाजिक एकोपा, महिलांचे सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता व ग्रामीण विकास याबाबत प्रभावी मार्गदर्शन शिवलीलाताई पाटील यांनी केले . शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत ग्रामविकासात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमास चिखली विधानसभा मतदारसंघाच्या मा. आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे वडील आदरणीय अंकुश बापू पडघान , जिल्हा परिषद बुलढाणा मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाखळे, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, मा. गट विकास अधिकारी समाधान वाघ ,सहाय्यक गट विकास अधिकारी गजानन पोफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सरपंच सौ.लता ताई डहाके ग्रामपंचायत अधिकारी कु. सुरेखा माने मॅडम,सदस्य महिला लक्ष्मी खेंन्ते, छाया गायकवाड, सुशीला बाई खरात, सुभाष रसाळ, ज्ञानेश्वर डहाके, प्रलय खरात, समाधान खेन्ते, पोलिस पाटील वाघ, भजनी मंडळ, पंचायत समिती चिखली सर्व विभाग,बचत गट, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत टाकरखेड (मु.) यांच्या वतीने यशस्वीरीत्या करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.


