mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Navodaya Vidyalaya should be established in Buldhana. Bhim Army District President Satish Pawar : बुलढाणा येथे नवोदय विद्यालय उभारण्यात यावे – भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार 

गरिबांच्या मुलांचे हक्काचे दालन असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी उभे करणार व्यापक जन आंदोलन

बुलढाणा,(प्रतिनिधी )

भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन बुलढाणा येथे नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याची मागणी केली आहे.

सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीच्या एक प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ही मागणी केली. सतीश पवार यांनी सांगितले की, बुलढाणा येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाल्यास गरीब आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल.

बुलढाणा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे व भौगोलिक दृष्ट्या  घाटाखाली आणि घाटावर अशा दोन भागांमध्ये विभाजित झालेला आहे. यामुळेच या जिल्ह्याला राज्य सरकारने दोन पालकमंत्री देखील दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना सुलभ व सोयीचे शिक्षण मिळावे यासाठी घाटावर म्हणजेच जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलढाणा या ठिकाणी नवोदय विद्यालय देणे गरजेचे आहे.

नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे ज्याचा उद्देश गरीब आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देणे आहे. सतीश पवार यांनी सांगितले की, बुलढाणा येथे नवोदय विद्यालयाची स्थापना झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल आणि त्यांचा विकास होईल.

तसेच गोरगरीब मुलांच्या हक्काचा दालन असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी व्यापक  जन आंदोलन उभारणार असल्याचे देखील सतीश पवार यांनी सांगितले आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top