mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Will the children who suffer the pain of the poor be brought into the mainstream of education? व्यथा अंगावर आसुड ओढणार्‍या पोतराजांची 

कष्ट उपसणारे चिमुरडे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील काय? 

बुलडाणा (प्रा. कडुबा पैठणे):अंगावर आसुडाचे फटके मारून पोट भरणारे पोतराज बांधव आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे त्यांची चिमुरडी मुलंही आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या अंगावर ढोलाच्या गजरात फटके मारून घेतात. ही बालकं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील काय हा एक मोठा यक्षप्रश्न आहे. मराठी लोककलेतील एक महत्त्वाचा भाग असलेले पोतराज आजकाल उपेक्षित होत चालले आहेत. पूर्वी गावोगावी फिरून भविष्य सांगणारे, देवीचे गाणे गाणारे आणि आसूडाचे फटके मारून घेणारे पोतराज आता क्वचितच दिसतात. शहरी आणि ग्रामीण भागात  आणि सोशल मीडियाच्या जमान्यात लोककला लोप पावताना दिसत आहे  पोतराजाची परिस्थिती जर आपण पहिली आर्थिक स्थैर्य नाही  शासन दरबारी दखल घेतली जात नाही उपासमारीची त्यांच्यावर वेळ तर येत नाही ना ? हा देखील प्रश्न येथे महत्त्वाचा आहे. शिक्षणापासून  ही लहान लहान पोरं  वंचित राहत आहेत. अंगावरती  आसूडाचे फटके मारून घेतात आणि भक्तांची मनोकामना पूर्ण होण्याचा ते  आग्रह धरतात. धाराशिव मधली ही मंडळी आहे. शिक्षणापासून वंचित आणि आर्थिक परिस्थिती ही एक गंभीर समस्या त्यांची आहे जी अनेक पोतराजांना भेडसावी लागते.  यांना शिक्षण मिळालेले नाही, त्यामुळे त्यांना योग्य रोजगार मिळत नाही. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने  त्यांना शिक्षण आणि अन्य आवश्यक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.  कुटुंबाची परिस्थिती गरीब  असल्याने  त्यांना शिक्षणासाठी आवश्यक संसाधने मिळत नाही .समाजातील काही वर्गांकाकडून पोतराजांना कमी लेखल्या  जातं त्यांना शिक्षण आणि अन्य बाबतीपासून वंचित राहावे लागत आहे. पोतराजांना शिक्षणाची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना शिक्षण आणि अन्य आवश्यक सुविधांपासून वंचित राहावे लागणार नाही. समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे, जेणेकरून पोतराजांना योग्य स्थान मिळेल.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top