बुलढाणा येथे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल कार्यालयाचे उद्घाटन

बुलढाणा/ प्रतिनिधी
आपण २२ प्रतिज्ञा नीट समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो असल्याची भावना मूकनायक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी व्यक्त केली. राजमाता माँ.साहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई ,फातिमा शेख ,यांच्या संयुक्त जयंती निमित्त बुलढाणा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल बुलढाणा येथील खामगाव रोड ला असलेल्या कार्यालयाचे जोरदार उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना सतीशदादा पवार म्हणाले की, समाजात नकारात्मक बाबीचा जास्त प्रमाणात विचार केला जातो. सकारात्मक बाबीला वेळ लागतो. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे संचालक सचिन मुन, राजश्री शाहू परिवाराचे सर्वेसर्वा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, प्रा.गजेंद्र गवई (मीडिया वार्ता), लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी गोरे, मूकनायक वार्ताचे मुख्य संपादक तथा मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश दादा पवार यावेळी उपस्थित होते. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल च्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सतीश पवार म्हणाले की सामाजिक राजकीय मंचावर काम करत असताना चळवळ गतिमान करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते चळवळ चालवण्यासाठी वर्तमानपत्राची आवश्यकता आहे, चळवळीला जर वर्तमानपत्र नसेल, चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे होते. स्वतःचं हक्काचं वर्तमानपत्र असणे आवश्यक आहे ही समस्या ओळखून त्यांनी मूकनायक वार्ता या साप्ताहिकाची बुलढाण्यातून सुरुवात केली. जनसामान्य माणसापर्यंत मूकनायक वार्ता हे वर्तमानपत्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जन माणसात सर्व सामान्य माणसात मूकनायक वार्ताला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल सर्व सामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचलेले असताना कोरोना काळात चैनल च्या काही अफवा फसवण्यात आल्या होत्या. मार्केटमध्ये एखाद्या वर्तमानपत्राची किंवा टीव्ही चॅनल ची प्रतिमा मलिन झाली की, पुन्हा नव्याने सामना करण्यास थोडा अवघड वाटतं ,त्याकडे लोक वेगवेगळ्या भावनेने पाहू लागतात. मधल्या काळात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल ची अवस्था त्याचप्रमाणे झाल्याची भावना जनसामान्य लोकांमध्ये होती . लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पुन्हा एकदा सर्वांची नैतिक जबाबदारी म्हणून नव्या ताकतीने जनमानसापर्यंत लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल घेऊन जाण्याचा संकल्प त्यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले पुढे २२ प्रतिज्ञा नीट समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कारण समाजात नकारात्मक बाबीचा जास्त प्रमाणात विचार केला जातो. सकारात्मक बाबीला वेळ लागतो. समाज हा दानशूर असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली .समाजाची अवस्था जाहिरात देण्याची नव्हे तर दान देण्याची , स्व: कष्टाच्या मेहनतीतून कमावलेला शेवटचा हिस्सा दान देण्याची समाजाची तयारी आहे . समाज खूप सुंदर असून कायम चळवळीला बळ देत आला आहे. दान मोठ्या मनाने स्वीकार केला पाहिजे असे प्रतिपादन देखील त्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.यावेळी उपजिल्हाधिकारी सूनील शेळके,सचिन मून,माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा प्रतिनिधी गोरे यांची भाषणे झाली सूत्रसंचालन डवरे यांनी केले.



每天都在战争,希望2026和平.
看不懂但大受震撼
wish you all the best
Mass comment blasting: $10 for 100k comments. All from unique blog domains, zero duplicates. I will provide a full report and guarantee Ahrefs picks them up. Email mailto:helloboy1979@gmail.com for payment info.If you received this, you know Ive got the skills.
香港服务器,4G8核18M宽带80G硬盘,只要一元钱!网址:host.993899.com
wish you best and best
Wish you happiness