mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Shiv Jayanti celebrated by implementing various activities at Sakegaon: साकेगांव येथे विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी 

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

चिखली (प्रतिनिधी) दि.19: तालुक्यातील साकेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले होते. सामान्य ज्ञान परीक्षा दि. 18-2-26 रोजी श्री. शिवाजी विद्यालय व जि. प. उच्च प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आली होती.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मानवंदना पूजन,हार अर्पण करून गावकऱ्यांना खिचडी वाटप करण्यात आली होती.

सायंकाळी6 वा.महाराजांची आरती घेऊन डीजे च्या तालावर शिवाजी महाराज व इतर महापुरुष्यांच्या गाण्यावर सर्व जाती धर्माचे तरुणाई महिला पुरुष हातात छत्रपती, घटनापती, हिंदुसूर्य, लोकशाहीर, असे पोस्टर घेऊन धीरकताना दिसली.

ग्रामपंचायत कार्यालयामद्ये जयंती उत्सव समितीने ग्रामपंचायत कमिटीच्या हस्ते सर्व महापुरुषयांचे पूजन करून हार अर्पण केले. ज्ञान परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विदयार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.प्रकाश निकाळजे, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य चौथे यांनी  महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ग्रा.पं.अभिकारी सुभाष वीर, पडघान सर व गावातील सर्व जाती समूहाचे नागरिक उपस्थित होते. 

आयोजकांनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top