mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

The Republican Party’s 69th Foundation Day will be celebrated with great enthusiasm at Vashi, Navi Mumbai, on October 3rd – Appeal by Buldhana Liaison Chief Babasaheb Jadhav:०३ ऑक्टोबरला नवी मुंबई वाशी येथे रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार – बुलढाणा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव  यांचे आवाहन

बुलडाणा(प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चा ६९ वा वर्धापन दिन दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई, वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दुपारी २.०० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार लोकनेते डॅा. रामदासजी आठवले  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, लोकनेते माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख उपस्थिती प्रदेश कार्यध्यक्ष बाबूरावजी कदम, प्रदेश सरचिटणीस गौतमदादा सोनोवने, राष्ट्रीय सचिव माजी मंत्री अविनास माहतेकर ,राज्यसंघटक पॅंथर सुधाकरजी तायडे, विदर्भअध्यक्ष मोहनजी भोयर , विदर्भ सचिव दलित मित्र विजय सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य मेळावा होणार आहे.

यावेळी बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, दक्षिण जिल्हाध्यक्ष भाई डॅा. भिमटागर दिलीप खरात, जिल्हाउपाध्यक्ष प्रा. दिलीप काकडे , जिल्हा संघटक संपर्क प्रमुख इंजिनियर शरददादा खरात, विदर्भ महीलाध्यक्षा आशाताई वानखडे, विदर्भ कार्यध्यक्ष पॅंथर मुरलीधर गवई, विदर्भउपाध्यक्ष भाई संजय वाकोडे, जिल्हाकार्यध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण , जिल्हा महीलाध्यक्षा वंदनाताई वाघ, जिल्हायुवाध्यक्ष प्रकाश पाटील, सर्वश्री तालुकाध्यक्ष बुलडाणा केशव सरकटे, मेहकर फोजी राहूल आवसरमोल, राणा मोरे, चिखली हीम्मतराव जाधव, मोताळा भाई बाळासाहेब आहिरे, मलकापूर दिलीप इंगळे, लोणार समाधान सरदार, सिंदखेड राजा पत्रकार भानुदास शेजूळ,नांदुरा पत्रकार शैलेश वाकोडे, जळगाव जामोद संतोष वानखडे, जिल्हामहिलाध्यक्ष रोहीणीताई, जिल्हामहासचिव निळकंठ दादा सोनुने, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल, सुधीरदादा हिवाळे, आकाशभैया साळवे यांनी सर्व आंबेडकरी जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे

ते म्हणाले, ०३ ऑक्टोबर हा रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा विचार घरा-घरात पोहोचवण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. मी सर्व केंद्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी, जिल्हा, विभागीय, तालुका आणि शाखा पातळीवरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी प्रेमी जनतेला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने वाशी येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि पक्षाची ताकद दाखवावी.”

या वर्धापन दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हाच्या सर्व पदाधिकारी व जिल्हा कार्यालयाकडून  करण्यात आले आहे.विनंती वजा सुचना करण्यात येते की, जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व तालुका प्रमुख तसेच सर्व सभासदांनी आपल्या स्तरावर जास्तीत जास्त जाहीरात करावी ही विनंती संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, दक्षिण, उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, भाई डॅा. दिलीप खरात यांनी सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पक्षाची ताकद व एकजूट दाखवावी असे एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे आवाहन केले आहे. आम्ही येतो तुम्ही ही या ही सर्वांना विनंती.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top