mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Cotton crop destroyed by herbicide spraying; farmer suffers loss of ₹70,000.   तणनाशक फवारून कपाशी पीक उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे 70 हजारांचे नुकसान

सिंदखेडराजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील बारलिंगा शिवारात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गट क्रमांक 68 मधील शेतकरी अतुल दिनकर भुसारी यांच्या शेतातील एक एकर कपाशी पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारून पीक उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे.

या घटनेत भुसारी यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याच शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण अवलंबून असल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे.

या प्रकरणी अतुल भुसारी यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून, दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने शेताची पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top