चाइल्ड हेल्प लाइन पथक आणि बुलढाणा शहर पोलिसांची संयुक्त कार्यवाही

बुलढाणा (प्रतिनिधी): चाइल्ड हेल्प लाईन बुलढाणा यांनी वेळीच हस्तक्षेप करत म्हसला बु., ता. जि. बुलढाणा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह हाणून पाडला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.23.जून 2026 रोजी ठीक 06.00 वाजता चांडक ले-आउट, शिक्षक कॉलनी बुलढाणा येथे या अल्पवयीन मुलीचा विवाह एका युवकाशी लावून देण्याचा बेत होता. या विवाहाची गुप्त माहिती चाइल्ड हेल्प लाईन बुलढाणा यांना मिळताच त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीचे वय 18 पेक्षा कमी असल्याची खात्री झाल्यानंतर लग्नविधी वेळीच थांबविण्यात आला.
प्राप्त तक्रारीनुसार तात्काळ मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बुलढाणा मा. श्री अमोल डिघुळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बुलढाणा मा.श्री दिवेश मराठे, प्रकल्प समन्वयक मा.श्री शेख सोहेप तसेच अध्यक्ष/ सदस्य बालकल्याण समिती बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात चाइल्ड हेल्प लाइन १०९८ बुलढाणा समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, प्रवीण गवई केस वर्कर मुकेश मोरे, राहुल सुरडकर यांनी तात्काळ बालविवाह घटनेचे गांभीर्य लक्षात घेता. संबंधित बुलढाणा शहर पोलीस निरीक्षक मा.श्री संग्राम पाटील यांना बालविवाह संदर्भात प्राप्त तक्रारीची माहिती दिली.
चाइल्ड हेल्प लाइन कर्मचारी पर्यवेक्षक सागर नरवाडे, प्रवीण गवई व केस वर्कर मुकेश मोरे तसेच बुलढाणा शहर पोलीस कॉन्स्टेबल सुशील जाधव यांनी थेट विवाहस्थळी धाड टाकली. शासनाने मुलीच्या वयाची चौकशी केली असता, ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला नातेवाइकांनी मुलगी उपवर असल्याचे सांगत चाइल्ड हेल्प लाइन टीम व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळेचा दाखला आणि जन्माचा दाखला तपासल्यानंतर मुलीचे वय अवघे १६ वर्षे असल्याचे समोर आले. चाइल्ड हेल्प लाइन यांनी कडक पाऊल उचलत तात्काळ हा विवाह थांबवला. तसेच मुलगी आणि मुलाच्या पालकांचे समुपदेशन केले. अल्पवयीन मुलीला सध्या बालकल्याण समितीच्या (CWC) समक्ष हजर करण्यात आले आहे.
“बालविवाह हा कायद्याने गुन्हा सोबतच लहान मुलांच्या भविष्याशी खेळ आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ चाइल्ड हेल्प लाइन १०९८ ला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल,” असे आवाहन स्थानिक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मा.श्री. अमोल डिघुळे यांनी केले आहे.

BK8speed! Sounds fast! Someone said their payouts are quick, gotta give it a try! Check it out here bk8speed
Locating a secure portal where I can wager with complete peace of mind has always been my top priority. The bdjeetbuz network runs strict security checks while keeping the experience totally hassle free. Every transaction stays transparent and the bonus terms are written in plain language. bdjeetbuz